सिंधुदुर्ग : विनायक राऊत यांनी केलेल्या आरोपांना आंबोलीतील जनता मतपेटीतून उत्तर देईल असा पलटवर आंबोली सरपंच सावित्री पालेकर यांनी केला.दरम्यान आंबोली कबुलायातदार प्रश्न बाबत समन्वयक व कृती समितीकडून आधी विनायक राऊत यांनी योग्य माहिती घ्यावी आणि मगच भाष्य करावे असा टोला देखील सौ.पालेकर यांनी यावेळी हाणला.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे नमूद करण्यात आले की विनायक राऊत हे गेले दहा वर्षे खासदार होते आंबोली पर्यटन वाढीसाठी त्यांनी किती प्रयत्न केले व दहा वर्षात त्यांनी किती निधी दिला हे आधी आंबोली वासियांना सांगावे आणि त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या टीका करावी. दरम्यान गेले दहा वर्षात आंबोलीत न फिरकलेले विनायक राऊत आता निवडणुकीच्या तोंडावरुन आंबोलीवासियांना भावनिक साथ घालून मत मागण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आंबोली वासिया यांच्या आव्हानाला बळी पडणार नसून येणाऱ्या निवडणुकीत आंबोलीतील जनता यांना मतपेटीतून उत्तर दिल अशी टीका देखील सौ.पालेकर यांनी यावेळी केली.