0.2 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

बांबू लागवड प्रोत्साहनासाठी विशेष समिती स्थापन

कणकवली : राज्यातील वातावरण बदलाच्या संकटाला तोंड देऊन शाश्वत विकास साधण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात बांबू लागवडीस शेतकऱ्यांना उद्युक्त करून बांबूचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्स गठित करण्यात आला आहे. शाश्वत बांबूविकास कार्यक्रमावर देखरेख ठेवण्यासाठी कार्यकारी समितीही गठित करण्यात आली आहे. समितीस बांबू लागवडीसाठी आवश्यक बाबींवर तांत्रिक सल्ला अथवा मार्गदर्शनासाठी प्रमुख तज्ज्ञ संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली एक तांत्रिक समिती गठित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार प्रमुख तज्ज्ञ संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली तांत्रिक समिती गठित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये मनरेगा, रोहयो, नियोजन विभागाचे महासंचालक अध्यक्ष असणार आहेत.

याशिवाय समितीमध्ये कृषी विद्यापिठांचे ‘प्रतिनिधी सदस्य, कृषी विज्ञान केंद्रे, इंटरनॅशनल बांबू अँड रटन ऑर्गयनायझेशन, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र बांबू विकास मंडळ आदी सदस्य असणार आहेत. ही तांत्रिक समिती आवश्यकतेनुसार इतर तज्ज्ञ व्यक्ती, संस्था आदींना निमंत्रित करू शकणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!