सावंतवाडी : घे भरारी फाउंडेशनच्या वतीने पोलीस स्टेशन येथे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रत्येकाने एक झाड जरूर लावावे आणि ते जोपासावे असा संदेश यावेळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिला. याप्रसंगी घे भरारी फाउंडेशनच्या फाउंडर मेंबर मोहिनी मडगावकर, अध्यक्षा रेखा कुमटेकर, कार्याध्यक्षा मेघना राऊळ, उपाध्यक्षा संध्या पवार, सेक्रेटरी सलोनी वंजारी, खजिनदार स्वप्नाली कारेकर, ज्योती दुधवडकर, शारदा गुरव, सुष्मिता नाईक, सीमा रेडीज , अरुणा नाईक, शरदिनी बागवे, सरिता फडणीस, गीता लोहार, मेघा भोगटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी पोलीस पुंडलिक सावंत, महिला पोलीस प्राजक्ता कदम, मुळीक मॅडम, आणि पोलीस स्टेशनचे इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते. घे भरारी च्या अध्यक्षा रेखा कुमटेकर यांनी सर्व पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांचे आणि पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांचे सहकार्याबद्दल विशेष आभार व्यक्त केले.