22.4 C
New York
Sunday, June 8, 2025

Buy now

कणकवलीत कनकनगर येथे घरफोडी

तीन लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल लंपास

कणकवली : शहरातील कनकनगर येथील शिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या समृद्धी मिलींद कोरगांवकर यांचे बंद असलेले घर शनिवारी रात्री ते रविवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना रविवारी सकाळी ८:४५ वा. च्या सुमारास उघडकीस आली आहे. या चोरीत तीन लाख पंधरा रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, तसेच किमती गणपतीची मूर्ती अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. समृद्धी कोरगावकर या आपल्या कर्तव्यावर गेल्या होत्या. तर पती, सासरे आणि मुलगा हे मालवण येथे नातेवाईकांकडे गेले होते. यावेळी घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्याने घराच्या पुढील दरवाजाचा कडी- कोयंडा तोडून प्रवेश केला. या घटनेबाबत समृद्धी कोरगावकर यांनी पोलिसात तक्रार नोंदविली आहे.

घरातील सामानाची सौ. कोरगावकर यांनी पाहणी केली असता, कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकलेल्या स्थितीत आढळले. यामध्ये सोन्याचे मंगळसुत्र ६.५ तोळे ( ६५ ग्रॅम ), सोन्याची चैन १३ ग्रॅम, लहान मुलाची चांदीची साखळी ५०० रुपये गणपतीची चांदीची मूर्ती १००० रुपये अशी एकूण ३ लाख १५ हजार रुपयांची चोरी झाली. समृद्धी कोरगांवकर सकाळी ८:४५ वाजता घरी आल्यावर त्यांना घराचा कडीकोयंडा तोडून दरवाजा उघडा आणि घरातील समान अस्ताव्यस्त असलेल्या स्थितीत आढळले.

एकंदरीत पाहिलं तर कणकवली तालुक्यात चोरीचे प्रमाण आता वाढू लागले आहे. बंद असलेली घरे किंवा कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या व्यक्तींवर नजर ठेवून घर फोडून सोन्या चांदीचे दागिने तसेच रोकड लंपास करण्याचे प्रकार वाढत आहेत. काही दिवसापूर्वी कणकवलीतील कलमठ मध्ये अज्ञात चोरट्यानी धाडसी चोरी केली होती. आता देखील तसाच काहीसा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे चोरट्यांना पकडणे हे एक प्रकारचे आव्हानच पोलिसांसमोर बनले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ करत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!