23.1 C
New York
Saturday, June 7, 2025

Buy now

कुंब्रल सरपंचाविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

बांदा : रमाई घरकुल योजनेच्या मागणीसाठी गेलेल्या एका अनुसूचित जातीच्या महिलेसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी कुंब्रल ग्रामपंचायतीचे सरपंच दादू बापू गोरे यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी की, कुंब्रल येथील एक महिला ४ जूनला त्यांच्या घरासाठी रमाई घरकुल योजनेची मागणी करण्यासाठी ग्रामपंचायतीत गेली होती. यावेळी सरपंच दादू गोरे यांनी ती महिला मागासवर्गीय समाजाची असल्याचे माहिती असूनही, तिचे काम करू नका, तिचा काहीही अधिकार नाही, असे बोलून हातवारे केले. तसेच सार्वजनिक ठिकाणी महिलेच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे अश्लील वर्तनही केले, अशी फिर्याद संबंधित महिलेने पोलिसांत दिली आहे. यावरून सरपंचाविरोधात गुन्हा दाखल करण्यात

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!