20.4 C
New York
Saturday, June 14, 2025

Buy now

प्रसन्ना परबची राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

सावंतवाडी : रोटरी क्लब ऑफ पालघर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२५” या राज्यस्तरीय स्पर्धेत सावंतवाडीची कन्या प्रसन्ना प्रदीप परब हिने ज्युनियर गटात रौप्य पदक पटकावले. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिची कर्नाटक राज्यातील दवणगिरी येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प्रसन्नाच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या स्पर्धेत ज्युनियर गटात ६७ किलो वजनी गटात प्रसन्ना परबने रौप्य पदकाला पटकावले. तिची निवड कर्नाटक राज्यातील दवणगिरी येथे २२ ते २७ जून दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी झाली आहे. तिच्या या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!