27.5 C
New York
Wednesday, June 4, 2025

Buy now

कॉमन मॅनला केंद्र बिंदू मानून जिल्ह्यात काम करणार ; पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर

ओरोस : कॉमन मॅनला केंद्र बिंदू मानून आपण जिल्ह्यात काम करणार आहे. तसेच जिल्हा पोलिस प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेले चांगले उपक्रम सुरूच ठेवून त्यात अजून काही चांगले बदल करणे शक्य असल्यास ते करणार आहे. या शिवाय नवीन संकल्पना राबविणार आहे, अशी माहिती नूतन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी दिली. सौरभ कुमार अग्रवाल यांची पुणे येथे बदली झाल्यावर त्यांच्या जागी ठाणे शहरी विभागाचे उपायुक्त डॉ दहिकर यांची नियुक्ती शासनाने केली आहे. या पदाचा पदभार स्वीकारल्यावर आज डॉ दहिकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना डॉ. दहिकर यांनी आपण सुरुवातीची काही वर्षे वैद्यकीय सेवेत घालविली आहेत. त्यानंतर पोलीस अधिकारी म्हणून नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे या शहरांसह ट्रॉफीक पोलीस, गुन्हे अन्वेषण आदी विभागांत पोलीस अधिकारी म्हणून काम केले आहे. मुंबई येथे पी आर ओ म्हणून सुध्दा काम केले आहे. आता आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुजू झालो आहोत. सिंधुदुर्ग जिल्हा नैसर्गिक दृष्ट्या खूपच सुंदर आहे. त्याच बरोबर येथील क्राईम खूप कमी आहे. त्यामुळे येथे कम्युनिटी पोलीसिंगला संधी आहे. परिणामी आपला कॉमन मॅन पोलीसिंगवर भर राहणार आहे. आयटी क्षेत्राचा वापर करून सुधारणा करण्यावर भर राहणार आहे. हा पर्यटन जिल्हा आहे. येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षितता देणे व त्यांना जिल्ह्यात चांगला अनुभव येण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेले व्हिजीटिंग कक्ष सुरूच ठेवणार आहे. जिल्हा पोलिसांच्या यापूर्वी सुरू असलेल्या चांगल्या सेवा कायम राहणार आहेत. त्या बंद केल्या जाणार नाहीत. त्यात आवश्यक असल्यास सुधारणा केल्या जातील. तसेच नागरिकांसाठी विविध संकल्पना राबवून पोलीस व नागरिक यांच्यात चांगले वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. जिल्ह्यात अवैध धंद्यांना थारा दिला जाणार नाही. कडक कारवाई केली जाईल. गोवा येथील दारू वाहतूक, विक्री असेल किंवा ड्रग्ज असेल याबाबत आपले कडक धोरण असणार आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहनांच्या तपासणी साठी नाहक पिळवणूक होणार नाही, असेही यावेळी पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!