20.4 C
New York
Saturday, June 14, 2025

Buy now

श्रृती शामसुंदर राऊळ ठरली “चल भावा सिटीत” रिॲलिटी शोमध्ये विजेता

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावची सुकन्या कु . श्रृती शामसुंदर राऊळ हिला झी मराठी च्या “चल भावा सिटीत “या रिॲलिटी शोमध्ये अंतिम सोहळ्यात विजेतेपद मिळविले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ऋषिकेश चव्हाण या तिच्या सहकाऱ्यासह तिने हे यश मिळवले आहे. या यशने कुमारी श्रुतीने शिवापूर च्या इतिहासात कला क्षेत्रात मानाचा तुरा खोवला आहे.

“चल भावा सिटीत” या रिॲलिटी शोमध्ये गेली तीन महिने श्रृती शामसुंदर राऊळ ही यशस्वी टास्क करत होती. अनेक कठीण परीक्षा तिने यशस्वी केल्या होत्या.श्रृती राऊळ ने चल भावा सिटीत” या कार्यक्रमात अभिनेता श्रेयश तळपदे यांच्या अनेक कठीण परीक्षा तिने यशस्वी केल्या. यात तिला वडील शामसुंदर राऊळ, आई लता राऊळ यांचे मार्गदर्शन लाभले. श्रृती च्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.श्रृती हिने या पूर्वी गोवा सुंदरी विजेती ठरली होती.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!