होय…! विनम्र सेवा आणि माफक दर हे ब्रीदवाक्य घेऊन केलेली वाटचाल ठरतेय यशस्वी
सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : अल्पावधितच सर्वसामान्य लोकांच्या सेवेत सक्रिय होऊन जनसामान्यांना आधारस्तंभ ठरणारं नेत्रसेवेच एक विश्वसनीय ठिकाण म्हणजे कणकवली शहरातील स्पेक्टो मार्ट ऑप्टिकल्स.! विनम्र सेवा आणि माफक दर हीच आमची ओळख हे ब्रीद वाक्य प्रत्यक्षात उतरवून स्पेक्टो मार्ट ऑप्टिकल्स ने उत्तुंग भरारी घेतली आहे. जिल्ह्यात स्पेक्टो मार्ट ऑप्टिकल्सची पहिली शाखा १ जानेवारी २०१० ला सुरू झाली. आणि ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने हळूहळू एक – एक ठिकाणी असे करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्पेक्टो मार्ट ऑप्टिकल्स च्या एकूण ८ शाखा सुरू झाल्या. आज पर्यंत अनेक ग्राहकांनी दिलेलं प्रेम आणि प्रतिसाद यामुळेच हे सगळं शक्य झालं आहे.
सर्वसामान्यांना परवडतील अशा सुविधा देखील उपलब्ध आहेत. आजपर्यंत जवळपास २००० पेक्षा अधिक रुग्णांची नेत्र तपासणी स्पेक्टो मार्ट ऑप्टिकल्सच्या माध्यमातून करण्यात आली. तर १००० पेक्षा जास्त लोकांना चष्मे वाटप देखील करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील नामांकित रुग्णलयांसमवेत मिळून एकूण ३२ कॅम्प तर ह्युमन राईट्स फॉर प्रोटेक्शन सोबत मिळून १० कॅम्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात घेतले गेले. काही शाळांमध्ये तसेच विद्यालयांत जाऊन व शालेय मुलांची मोफत नेत्र तपासणी करून सवलतीच्या दरात चष्मा वाटप देखील करण्यात आले. असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन स्पेक्टो मार्ट ऑप्टिकल्स पुढील वाटचाल करत आहे. आजच्या घडीला स्पेक्टो मार्ट ऑप्टिकल्स जिल्ह्यातील प्रत्येक ग्राहकांच्या घराघरात जाऊन पोहोचले आहे.
सध्या कणकवली येथील स्पेक्टो मार्ट ऑप्टिकल्स मध्ये उन्हाळी ऑफर सुरू आहे. यामध्ये ४०% पर्यंत सूट देण्यात येत आहे.
तसेच बजाज फायनान्स च्या माध्यमातून चष्मा लोनवर देखील ग्राहकांना मिळणार आहे. तसेच कणकवलीसह इतर ठिकाणच्या शोरूममध्ये ट्रेंण्डी डिजाईनर फ्रेम्स व पोलोरोइड UV फिल्टर गॉगल्स चे भव्य दालन, अनुभवी नेत्र चिकित्सक आणि कॉम्पुटरद्वारे अचूक नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी, सर्व प्रकारच्या प्रोग्रेसिव्ह लेन्स बद्दल योग्य मार्गदर्शन, मुलांच्या ऑनलाइन अभ्यासासाठी विषेश BLUE BLOCK लेन्सेस, सर्व कंपनींच्या कॉन्टॅक्ट लेन्स आणि सोल्युशन उपलब्ध, चष्म्याचे रिपेरिंग व मेंटेनन्स अगदी मोफत करून दिले जाते.
तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, देवगड जामसंडे, सावंतवाडी, मालवण, वैभववाडी, बांदा, शिरोडा, आरोंदा याठिकाणी स्पेक्टो मार्ट ऑप्टिकल्स च्या सर्व्हिस शाखा आहेत. एकदा अवश्य भेट द्या आणि नेत्रसेवेचा लाभ घ्या.