17.9 C
New York
Saturday, May 18, 2024

Buy now

खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर | रुग्णालयात उपचार सुरु

धाराशिव : ऊन, वारा, तहान भूक विसरून सध्या फक्त लोकसभा निवडणुकीच्या वातावरणात नेते पुढारी प्रचारसभा घेत आहेत. उन्हात उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. अशातच या उष्णतेचा फटका ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना बसला आहे. धाराशिवमध्ये प्रचारसभेत त्यांना चक्कर आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

येत्या काहीच दिवसांवर लोकसभा निवडणूक असल्याने सर्वच राजकीय पक्ष आपल्या उमेदवाराचा जोरदार प्रचार करत आहे. ऊन, वारा, तहान भूक विसरून सध्या फक्त लोकसभा निवडणुकीच्या वातावरणात नेते पुढारी प्रचारसभा घेत आहेत.

उन्हात उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. अशातच या उष्णतेचा फटका ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना बसला आहे. धाराशिवमध्ये प्रचारसभेत त्यांना चक्कर आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारसभेत आमदार कैलास पाटील यांना चक्कर आली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं आहे. कैलास पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आमदार कैलास पाटील यांना उष्माघातामुळे हा त्रास झाल्याची माहिती मिळतेय. ओमराजे निंबाळकर यांची सभा सुरु होती. यावेळी अचानक आमदार कैलास पाटील यांना चक्कर आली आहे. ते चक्कर येऊन जमिनीवर पडले. घटनेचं गांभीर्य ओळखून काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना एका गाडीतून रुग्णालयात नेत असतानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!