पालकमंत्री ना. नितेश राणेंनी केले स्वागत
कणकवली : चव्हाणवाडी उबाठा ग्रामपंचायत सदस्या प्रणिता प्रकाश चव्हाण, ह.सोसा. सदस्य आदेश सूर्यकांत भालेकर, तसेच गावातील विविध मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
त्यांच्यासोबत यशवंत भोसले, पुंडलिक चव्हाण, प्रकाश चव्हाण, जगदीश चव्हाण, मंगेश चव्हाण, सचिन चव्हाण, राकेश भोसले, रोहन भोसले, ज्ञानदेव चव्हाण, संतोष दाभोळकर, सुभाष चव्हाण, सूर्यकांत चव्हाण, दिनेश भोसले, महानंद चव्हाण, मानसी चव्हाण, मीनल चव्हाण, विजय भोसले, आकाश चव्हाण, मनोहर चव्हाण, रुपेश चव्हाण, शांताराम भोसले, सुधीर चव्हाण, गजानन चव्हाण, सुगंधा चव्हाण, विकास भोसले, प्रमोद चव्हाण, महेश हल्कुळकर, तुकाराम चव्हाण, कृष्णा भोसले, मंगेश चव्हाण आणि राजाराम भोसले यांचा समावेश होता.
उपसरपंच सर्वेश दळवी, ग्रामपंचायत सदस्य शंकर घाग, तसेच भाजपचे स्थानिक पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते. तसेच संदेश उर्फ गोट्या सावंत हे ही उपस्थित होते. या बैठकीत ग्रामविकास, रस्ते सुधारणा, पाणीपुरवठा, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रवेश केल्याची माहिती उपस्थितीने दिली आहे.