25.5 C
New York
Saturday, April 19, 2025

Buy now

जिल्ह्यातील विकास कामात पालकमंत्री यांच्या टक्केवारी मुळे कामे नित्कृष्ट दर्जाची – सतीश सावंत

महाळुंगे- गढीताम्हाणे रस्त्याची विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली पहाणी

देवगड : तालुक्यातील महाळुंगे – गढीताम्हाणे गावातील रस्त्याच्या नित्कृष्ट कामाचा खुलासा गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत व्हिडिओ द्वारे केला होता. डांबरीकरण केलेला रस्ता ग्रामस्थांनी हाताने उखरवून दाखवला. आज विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी गावातील ग्रामस्थांन सोबत रस्त्याची पाहणी केली. यावेळी या रस्त्याचे इंजिनियर पुरी देखील उपस्थित होते.

यावेळी सतीश सावंत यांनी पालकमंत्री यांच्यावर टीका केली, जिल्ह्यातील प्रत्येक विकासकामात यांची टक्केवारी असल्यामुळे जिल्ह्यातील कामे ही नित्कृष्ट प्रकारची होत आहेत. या महाळुंगे-गडी ताम्हाणे रस्त्याबाबत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता भोसले यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले.

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक म्हणाले, या महाळुंगे -गडी ताम्हाणे जवळ चिरे खाणी असल्या कारणाने रस्त्यावरून अवजड वाहतूक जास्त प्रमाणात होते. यासाठी हा रस्ता चांगल्या प्रकारचा होणे गरजेचे आहे. यासाठी या रस्त्या वर आणखी एक लेयर व्हावा व सिलकोट देखील करावा अशी मागणी आम्ही वरिष्ठ अधिकारी यांच्या जवळ करणार असल्याचे सांगितले. तसेच हा रस्ता मा. खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून शिवसेनेचा माध्यमातून मंजूर झाला होता. रस्त्याचे कामच चांगल्या पद्धतीने व्हावे ही आमची प्रमुख मागणी आहे.

यावेळी विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, देवगड तालुकाप्रमुख रविंद्र जोगल, उपतालुका प्रमुख विष्णू सावंत, मंगेश फाटक, प्रसाद दुखंडे, विक्रांत नाईक, सागर गोरुले, सचिन पवार, केतन खाडये व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!