सावंतवाडी : कंत्राटी पद्धतीवर नगरपालिका परिसरात कचरा उचलण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न नक्कीच सोडवले जातील,असे आश्वासन सावंतवाडीचे प्रभारी मुख्याधिकारी पारितोष कंकाळ यांनी दिल्यानंतर गेले चार दिवस सुरू असलेले काम बंद आंदोलन अखेर कर्मचाऱ्यांनी मागे घेतले. यावेळी किमान वेतन वाढ, ईपीएफ, पीएफचा मुद्दा आणि अडकलेले पैसे तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सोयी- सुविधा पुरवण्याचे आश्वासन श्री. कंकाळ यांनी दिले.यासाठी माहिती अधिकारी प्रमुख सुशील चौगुले व सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी मध्यस्थी केली. ठेकेदारांकडून वारंवार फसवणूक झाल्यामुळे ईपीएफ अडकल्याने, तसेच आपल्या अनेक मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे सावंतवाडी पालिकेत काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी गेले चार दिवस आंदोलन सुरू केले होते. यावेळी काल दोन कर्मचाऱ्यांची प्रकृती खालावली होती. दरम्यान आज त्या कर्मचाऱ्यांना प्रभारी मुख्याधिकारी कंकाळ यांनी चर्चेसाठी बोलावले.यावेळी बंद खोलीत झालेल्या चर्चेत संबंधित कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. यात किमान वेतन वाढ, पीएफ, ईपीएफ तसेच खात्यात जमा झालेले पैसे यासह आरोग्याच्या दृष्टीने मास, हँड ग्लोज, सेफ्टी जॅकेट ड्रेस, पावसाळी रेनकोट आवश्यक श्री. कंकाळ यांनी दिले. त्यानंतर आपण काम बंद आंदोलन मागे घेत असल्याचे, संबंधित कर्मचाऱ्यांनी जाहीर केले. यावेळी स्वच्छता अधिकारी पांडुरंग नाटेकर, दीपक म्हापसेकर, धनंजय देसाई, कंत्राटी कामगार बाबू बरागडे, सचिन कदम, राजू मयेकर, गणेश खोरागडे, आदी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर, उपस्थित कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी व प्रशासनाचे आभार मानले. आमच्या मागण्या पूर्ण करा, आम्ही यापेक्षाही जीव तोडून काम करू. मात्र, आमच्या पोटावर मारू नका असे, त्यांनी यावेळी सांगितले. त्यावेळी काही झाले तरी तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही असा, शब्द मुख्याधिकारी कंकाळ यांनी दिला.