कणकवली : जिल्हा परिषद शाळा कणकवली क्रमांक पाच मध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी मंचावर साहित्यिक प्रा. रीमा भोसले, सखी सावित्री समिती सदस्य सन्मारोजाखडपकर ,समाजसेविका सन्मा प्रियाली सुरेंद्र कोदे , अंगणवाडी सेविका स्वाती पोयेकर शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष केतकी दळवी ,शाळेच्या मुख्याध्यापक कल्पना मलये, उपशिक्षक शर्मिला चव्हाण इत्यादी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ता प्राध्यापक रीमा भोसले यांनी यानिमित्त पालक महिला विद्यार्थी विद्यार्थिनी यांना जबाबदार पालकत्व आणि सद्यस्थितीत विद्यार्थ्यांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. सध्याच्या काळात पालकांच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या असून पालकांनी अधिक सजग राहणे गरजेचे आहे. आपल्या पाल्यांना मोबाईल पासून दूर ठेवले पाहिजे आणि वाचनाची आवड निर्माण केली पाहिजे.
सन्मा रोजा खडपकर यांनी समाज माध्यम आणि महिला व मुली याविषयी उदबोधन पर मार्गदर्शन केले .तसेच मुलींच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यानंतर महिला पालकांसाठी खेळ पैठणीचा घेण्यात आला. विविध प्रकारच्या क्षमता महिला पालकांच्या अंगी याव्या याकरिता विविध खेळ घेण्यात आले सदर स्पर्धेचे परीक्षण अनुष्का पडते यांनी केले. खेळ पैठणीचा या खेळात विजेते तीन स्पर्धक प्रथम क्रमांक गौरी पाताडे द्वितीय क्रमांक संदिशा शिगवण तृतीय क्रमांक रसिका मिराशी या सर्वांना सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे पुरस्कृत पैठणी देऊन सन्मा प्रियाली कोदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक कल्पना मलये यांनी केले. तर सूत्रसंचालन उपशिक्षक शर्मिला चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शालेय मंत्रिमंडळ शाळा कणकवली क्रमांक पाच अंगणवाडी सेविका स्वाती पोयेकर समीक्षा कोरगावकर पालक या सर्वांचे बहुमूल्य असे सहकार्य लाभले.