15.7 C
New York
Sunday, October 19, 2025

Buy now

महिला दिनाच्या पूर्वसंध्येपर्यंत मिळणार डबल गिफ्ट

मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दिलासा देणारी बातमी आहे, ती म्हणजे येत्या ७ मार्चपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे १५०० आणि मार्च महिन्याचे १५०० असे एकूण ३००० रुपये जमा होणार आहेत. सरकारकडून या महिन्यात लाभार्थी महिलांना डबल गिफ्ट मिळणार आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स पोस्ट करत माहिती दिली आहे.

‘लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट ! महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे. ७ मार्च २०२५ पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी ३००० रुपये जमा करण्यात येईल’ अशी पोस्ट आदिती तटकरे यांनी केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!