7.6 C
New York
Wednesday, March 12, 2025

Buy now

आडवली-मालडी गावात उबाठाला खिंडार

सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी शिवसेनेत..

मालवण : आमदार निलेश राणे यांच्या विकास कार्यामुळे प्रेरित होऊन मालवण तालुक्यातील आडवली मालडी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत ( शिंदे गट ) प्रवेश केला.

सद्या शिवसेनेत ( शिंदे गट) पक्षप्रवेशासाचा धडाका शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून सुरु आहे. आज आडवली येथे शिवसेना आडवली मालडी जिल्हापरिषद मतदारसंघ संपर्क प्रमुख विनायक बाईत यांच्या माध्यमातून झाला. मालवण कुंभारमाठ येथील दत्ता सामंत यांच्या निवासस्थानी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत आणि आडवली येथील उबाठा शिवसेना पदाधिकारी अरविंद साटम, विनोद साटम, शाखाप्रमुख विष्णु घाडीगावकर यांच्या पुढाकारातून सरपंच संदीप आडवलकर, उपसरपंच भक्ती साटम, सदस्य सोनाली पराडकर, ज्योती लाड, प्रमोद मसुरकर, विजय कदम, हरिश्चंद्र सावंत, भरतरीनाथ साटम, नितीन पराडकर, रसिका घाडीगावकर, तेजा घाडीगावकर, मिनल साटम, अस्मिता घाडीगावकर, सुशांत साटम, राकेश घाडीगावकर, महेश जाधव, समीर साटम, वैशाली घाडीगावकर, समिधा आडवलकर, समिता आडवलकर, कविता घाडीगावकर, अनिता घाडीगावकर, सुलोचना घाडीगावकर, रामचंद्र यादव, महेश पांचाळ, संभाजी साटम, अमोल घाडी, नितीन घाडीगावकर, लक्ष्मण घाडीगावकर, अजित घाडीगावकर, अमोल कदम, योगेश कदम, सागर कदम, नितीन कदम, संदीप सावंत रवींद्र मसुरकर, ओमप्रकाश मसुरकर, प्रथमेश साळकर, गंगाराम राणे, प्रकाश सावंत, मिलिंद मसुरकर, अमृता चव्हाण यांसह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी शिंदे शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर, उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, तालुकाप्रमुख महेश राणे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आडवली मालडी जिल्हापरिषद मतदारसंघ संपर्क प्रमुख विनायक बाईत, विभाग प्रमुख सुनील घाडीगावकर, श्रावण माजी सरपंच प्रशांत परब, निलेश बाईत, जेरॉन फर्नांडिस, रुपेश पाटकर, दिलीप बिरमोळे, राजू बिडये, मंदार लुडबे, भाऊ मोरजे, युवासेना जिल्हाप्रमुख मेहुल धुमाळे, ऋत्विक सामंत, युवती सेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, मधुरा तुळसकर, प्रियांका मेस्त्री, क्रांती धुरी, स्नेहा घाडीगावकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!