कणकवली : उद्योजक कै. उत्तम धुमाळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवार ९ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत चौंडेश्वरी हॉल येथे रक्तदान शिबिर आयोजन केले आहे. याशिवाय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.
आरोग्य तपासणी शिबिरात मोतीबिंदू तपासणी नेत्रतज्ज्ञ डॉ. अशोक कदमहे करणार आहेत. दंत चिकित्सा शिबिरात डॉ. हर्षदा माळवदे – करंगुटकर या तपासणी करणार आहेत. रक्तदान शिबिरात जास्त जास्त दात्यांनी रक्तदान करावे आणि आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना युवासेनेचे जिल्हाप्रमुख मेहुल धुमाळे यांनी केले आहे.