28.2 C
New York
Thursday, July 10, 2025

Buy now

स्वत:ला सिद्ध केल्यास प्रगतीची कवाडे खुली : जयू भाटकर

कणकवली कॉलेजतर्फे आयोजित प्रगट मुलाखतीत मार्गदर्शन

कणकवली : युवकांना सध्याच्या काळात करिअरच्या जेवढ्या संधी आहेत तेवढीच आजकाल स्पर्धा वाढलेली आहे. त्यामुळे तुम्हाला स्वत:ची क्षमता िसद्ध करावी लागेल. श्रमाला प्रतिष्ठा देताना कुठलेही काम कमी प्रतीचे मानू नये. वाचनाला वक्तृत्व कौशल्याची जोड असेल तर तुमची माध्यम क्षेत्रातील प्रगती निश्चित आहे, असे मार्गदर्शक प्रतिपादन दूरदर्शनचे माजी सहाय्यक संचालक जयू भाटकर यांनी केले.
कणकवली कॉलेजच्या वतीने एचपीसीएल सभागृहात िमडीया क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी ‘माध्यमातील िदवस’ या उपक्रमाअंतर्गत जयु भाटकर यांच्या प्रगट मुलाखतीचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. यावेळी श्री.भाटकर बोलत होते. आपल्या माध्यम क्षेत्रातील प्रवासाचा उलगडा त्यांनी िवविध अंगाने उलगडला. िनलेश पवार यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी कणकवली कॉलेजचे प्रा. युवराज महालिंगे, प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, प्रा. हरिभाऊ िभसे, डॉ.सोमनाथ कदम, प्रा. मनोज कांबळे, प्रा. एम. के. माने, डॉ.संदीप नाटेकर, प्रा. सीमा हडकर, डॉ. सुरेश पाटील, प्रा. पाटील मॅडम आदी उपस्थित होते.

श्री. भाटकर यांनी आपण लहानपणापासून कसे घडत गेलो, त्याचे प्रसंगांतून वर्णन केले. तसेच कॉलेज जीवनात गुरूजनांचे पुढील वाटचालीत योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन िमळाल्याचे सांिगतले. श्री. भाटकर म्हणाले की, आपण मोठे हाेताना गुणवत्ता हा निकष हवा.
कॉलेज जीवनातील वाचन आणि वक्तृत्वाने मला मोठे होण्याची संधी िमळाली आणि त्याचा माझ्या प्रगतीमध्ये मोठा वाटा आहे. यशस्वी होण्यासाठी आपल्या क्षेत्रातील वरिष्ठांना शंभर टक्के रिपोर्टिंग सातत्याने करत रहाणे, वेळ पाळणे, स्वयंिशस्त बाळगणे आवश्यक ठरते, असे सांगताना माझ्या २४ वर्षांच्या दूरदर्शनच्या कारकीर्दीत मी एकदाही लेटमार्क घेतला नाही, असेही ते म्हणाले. युवकांनी कोणत्याही क्षेत्रात कुठल्याही शहरात, प्रांतात जाऊन करिअर घडवले तरी त्याचा फायदा आपल्या मातीला करून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!