सिंधुदुर्ग : बुधवारी महाशिवरात्रीच्या दिवशी संजय पडते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवधनुष्य हाती घेतले. यावेळी आ. निलेश राणे, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर संजय पडते कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. आज सर्वांच्या प्रश्नांच्या उत्तर मिळाले असून त्यांच्या या प्रवेशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे.