21.3 C
New York
Sunday, September 14, 2025

Buy now

आमदार निलेश राणे यांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनधिकृतरीत्या वास्तव्यास असलेल्या परप्रांतीयांची चौकशी करून कारवाई करा

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनधिकृतरीत्या वास्तव्यास असलेल्या परप्रांतीयांची चौकशी करून कारवाई व्हावी. असे पत्र आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक यांना दिले आहे.

दरम्यान, आमदार निलेश राणे यांचे पत्र प्राप्त होताच पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाईचा बडगा उगाराला. मालवण पोलीस ठाण्याच्या वतीने तात्काळ कारवाई करतं 36 परप्रांतीयांचे आधारकार्ड सत्यता पडताळणीला पाठवले आहेत. अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.

काही परप्रांतीय व्यक्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनधिकृतपणे वास्तव्य करून येथे व्यवसायाच्या नावाखाली अनेक गैरप्रकार करत आहेत. यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मुस्लिम समाजातील व्यक्तींची संख्या जास्त आहे. अश्या लोकांजवळ कुठलेही वास्तव्याचे पुरावे नाहीत, बनावट आधारकार्ड व इतर तत्सम कागदपत्रे बनवून तसेच अत्यंत जुन्या व नोंदणी नसलेल्या गाड्यांचा वापर या लोकांकडून होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अश्या लोकांचा वावर हा जिल्ह्मच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे.

तरी सदरील परप्रांतीय लोकांच्या कागदपत्रांची त्वरित चौकशी करून अनधिकृत असलेल्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिबंधित करण्याची कार्यवाही करावी.

या लोकांनी वास्तव्याची कागदपत्रे आधार कार्ड, रेशनकार्ड कोणत्या कागदपत्रांच्या आधारे बनवली याची शहानिशा करून चौकशी व्हावी. तसेच त्यांच्या वापरातील गाड्‌यांचीही तपासणी करून त्या जप्त कराव्यात. अश्या व्यक्तींच्या राहत्या घरांची झाडाझडती घेत तात्काळ कारवाई करावी.
शासनाने सदरील विषयाची गांभीर्यता लक्षात घेता त्वरित कार्यवाही करावी व केलेल्या कारवाई बाबत कळवावे. असे पत्र आमदार निलेश राणे यांनी पोलीस अधीक्षक यांना दिले आहे. त्यानुसार मालवण पोलिसांकडून त्वरित कारवाई करत 36 परप्रांतीय यांची आधार कार्ड पडताळणीसाठी पाठवली आहेत.

 

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!