कणकवली : शहरानजीक असलेल्या आशिये ठाकरवाडी येथील सुनील गोपाळ गवाणकर ( वय ५९ रा. आशिये, कणकवली ) यांचे गुरुवारी दुपारी निधन झाले. मागील दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना उपचारासाठी कणकवली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती अधिक खालावली आणि उपचार सुरू असताना त्यांच गुरुवारी दुपारी निधन झालं. सुनील गवाणकर यांना भजनाची आणि दशावताराची मोठी आवड होती. पारंपरिक भजन क्षेत्रातील भजनाची आवड असलेले बुवा म्हणून पाहिले जात होते. अनेक नाटकांमध्ये देखील त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या निधनाने आशिये गावावर शोककळा पसरली आहे. गुरुवारी सायंकाळी आशिये येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे, भाचे – भाची असा परिवार आहे. उपविभागीय पोलीस अधिकरी कार्यालय कणकवली येथे पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असलेले सूरज गवाणकर यांचे ते वडील होत.