22.7 C
New York
Friday, July 11, 2025

Buy now

शिवजयंती उत्सव समितीच्या महारॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवजयंती निमित्त वरवडे ते कणकवली रॅली संपन्न

युवा नेते प्रताप भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली रॅली

रॅलीत शिवभक्त, दुचाकी, चारचाकीस्वार मोठ्या संख्येने सहभागी

कणकवली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समिती कणकवली तालुक्यातर्फे काढण्यात आलेल्या भव्य दुचाकी – चारचाकी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मराठा सेवा संघाचे कोकण प्रांत सचिव, शिवजयंती उत्सव समिती कणकवलीचे अध्यक्ष तथा मराठा समाजाचे युवानेते प्रताप भोसले यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीत शिवप्रेमी, दुचाकी, चारचाकीस्वार‌ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

रॅलीचा प्रारंभ वरवडे येथील पुलानजीक प्रताप भोसले यांच्या उपस्थितीत, शिवजयंती उत्सव समिती कणकवलीचे उपाध्यक्ष कान्हा मालंडकर यांच्या हस्ते झाला. यावेळी वरवडे सरपंच करूणा घाडीगांवकर, बिडवाडी सरपंच सौ. पूजा चव्हाण, उपसरपंच सुदाम तेली, पिसेकामते माजी सरपंच सुहास राणे, कलमठ माजी सरपंच निसार शेख, सामाजिक कार्यकर्ते संजय साळसकर आदी उपस्थित होते. दुचाकीवरील मावळा व बालशिवाजी, खास सजविलेल्या, किल्ल्याची प्रतिकृती असलेल्या वाहनामध्ये असलेले बालशिवाजी व बाल मावळे लक्षवेधी दिसत होते.

जोरदार शिवघोषणा

रॅलीदरम्यान शिवप्रेमींनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, ‘जय जिजाऊ, जय शिवराय’, ‘तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ जय शिवराय’ अशा घोषणांनी शिवभक्तांनी रॅलीचा परिसर निनादून सोडला.

शिवपुतळ्यांना पुष्पहार अर्पण

फटक्याची आतषबाजीत सुरु झालेली रॅली कुंभारवाडीमार्गे कलमठ – बाजारपेठ येथे दाखल झाली. तेथे आयोजित शिवजयंती उत्सवातील शिवभक्तांनी रॅलीचे स्वागत केले. तेथे शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली कणकवलीच्या दिशेने निघाली. कणकवलीतील आप्पासाहेब पटवर्धन चौकात उबाठा शिवसेना आयोजित शिवयंती उत्सवाला‌ भेट देण्यात आली. तेथे शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर रॅली बाजारपेठेच्या दिशेने निघाली. पुढे शिवाजीनगर येथे आयोजित शिवजयंती उत्सवास भेट देण्यात आली. तेथे‌ शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली कणकवली – कनेडी मार्गावरून येथील सर्व्हिस रोडवर व पुढे शिवाजी महाराज चौकात दाखल झाली. तेथेही शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करतानाच सकल मराठा समाज आयोजित शिवजयंती उत्सवास भेट देण्यात आली व रॅलीची सांगता झाली.

दरम्यान शिवजयंती उत्सव समितीतर्फे दिवसभर कणकवली तालुक्यातील विविध शिवजयंती उत्सवांना भेटी देण्यात आल्या. दिवसभरात विविध सामाजिक उपक्रमही पार पडले. रॅली यशस्वीतेबाबत मराठा समाजाचे युवा नेते प्रताप भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

शिवप्रेमींची मोठी गर्दी

रॅलीमध्ये शिवजयंती उत्सव समितीचे सचिव दिनेश सावंत, संतोष उर्फ पप्पू पुजारे, प्रवीण उर्फ बाळा सावंत, सुभाष मालंडकर, आनंद घाडीगांवकर, अमित पवार, रुपेश नाडकर्णी, इब्राहिम शेख अली, राजू कुडाळकर, राज सावंत, मनोज घाडीगांवकर, बंड्या मालंडकर, भाई सावंत, सोहेल खान, सलमान शेख, राजू कुडाळकर, अभिजीत चव्हाण, अमोल घाडीगांवकर, समीर कदम, सचिन राणे, प्रसाद गावकर, राजू बावकर, ओंकार कदम आदींसह शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शिवरायांच्या कार्याच्या स्मरणासाठीच रॅली : प्रताप भोसले

यावेळी प्रताप भोसले म्हणाले, शिवाजी महाराजांनी रयतेचे हिंदवी स्वराज्य निर्माण केले. केवळ हिंदू अथवा मराठाच नव्हे तर अगदी मुस्लिम बांधवांनाही सोबत घेऊन अठरा पगड जातीतील मावळ्यांची वज्रमुठ महाराजांनी बांधली होती. शिवरायांचा हाच राष्ट्रीय एकात्मतेचा आणि बंधूतेचा संदेश सर्वदूर पोहोचावा, यासाठीच शिवजयंती उत्सव  समितीतर्फे प्रतिवर्षी दुचाकी चारचाकी रॅलीचे आयोजन केले जाते व त्यानिमित्त सामाजिक उपक्रमही राबविले जातात. तरूणाईसह सर्व अबाल वृद्धांनी महाराजांच्या कायार्चा आदर्श घ्यावा, असे आवाहनही प्रताप भोसले यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!