23.6 C
New York
Sunday, August 31, 2025

Buy now

आगीत बेचिराख झालेल्या “त्या’ घराची तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केली पहाणी

आगीत तब्बल १९ लाख ७१ हजार रुपयांचे नुकसान ; तर किराणा दुकानाचे ३ लाख ४० हजारांचे नुकसान

कणकवली – तालुक्यातील नांदगाव मोरयेवाडी येथील मनोहर आत्माराम बिडये व पुजा देवेंद्र बिडये यांच्या सामाईक बंद घराला सोमवारी रात्री ८:३० वा. च्या सुमारास अचानक आग लागली होती. या आगीत पुर्ण घर आणि दुकान जळून बेचिराख झाले होते. सुमारे एक तासानंतर दाखल झालेल्या अग्निशामक बंबालाही ही आग आटोक्यात येताना कठीण जात होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी कणकवलीचे तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांनी नांदगाव येथील आगीत बेचिराख झालेल्या घराची पहाणी केली.

यावेळी त्यांच्या समवेत नांदगाव सरपंच भाई मोरजकर, डी.एम. पाटील, मंडळ अधिकारी आत्मबोध जाधव, तलाठी सुदर्शन अलकुटे, ग्रामविकास अधिकारी आर. डी. सावंत, नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर, ग्रामपंचायत सदस्य विठोबा कांदळकर, शंकर मोरये, संतोष बिडये, आदी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

आगीत तब्बल १९ लाख ७१ हजार रुपयांचे नुकसान ; तर किराणा दुकानाचे ३ लाख ४० हजारांचे नुकसान

आगीत जळून बेचिराख झालेल्या घरातील साहित्य इलेक्ट्रॉनिक वस्तू, ७ तोळे सोनेअसे एकूण १९ लाख ७१ हजार रुपयांचे नुकसान झाले. बाजूला असलेल्या त्यांच्याच मालकीच्या गाळ्यात लवू राजाराम लाड यांच्या किराणा दुकान, कोल्ड्रिंक्स व इतर साहित्य होते. त्यांचे एकूण ३ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद झाली आहे.

या घटनेचे तातडीने पंचनामे करा ; तहसीलदारांच्या सूचना

आग लागून नुकसान झालेल्या वस्तूंची माहिती घेतली तर साधारणपणे लाखोंचे नुकसान झाले आहे. तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी प्रत्यक्ष पहाणी केल्यानंतर तलाठी तसेच विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!