कासार्डे येथे (MMCL) महाराष्ट्र मिनिरल कॉर्पोरेट लिमिटेड कडून विषारी दूषित पाणी नदी पात्रात
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी वेधले तहसीलदारांचे लक्ष
कणकवली : कासार्डे येथे (MMCL) महाराष्ट्र मिनिरल कॉर्पोरेट लिमिटेड कडून मायनिंग च्या ठिकाणी (सिलिका) वाळूचा माल काढला जातो. हा वाळू साठा काढून वॉश केल्यामुळे आता त्या ठिकाणी लाखो लिटर विषारी पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात साठला आहे. याची छायाचित्रे देखील दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून सादर केली आहेत. या मायनिंग शेजारी वाळू वॉशिंग चा प्लॅन्ट असून या ठिकाणी कॉस्टिक सोडा व विषारी केमिकल चा वापर करून ही वाळू वॉश केली जाते. वाळू वॉश केलेल्या लाखो लिटर विषारी पाण्याचा साठा दरवर्षी जवळच्या नांदगाव, पियाळी, तोंडवली – बावशी, असलदे, कोळोशी, आयनल या गावच्या नदी पात्रात सोडला जातो. हा विषारी पाण्याचासाठा नदीपात्रात सोडल्यामुळे नदी पात्रातील पाणी दूषित होत आहे. यामुळे पशु, पक्षी व मानवजीव यांच्या आरोग्यास जीवितहानी होऊ शकते.
(MMCL) महाराष्ट्र मिनिरल कॉर्पोरेट लिमिटेड आता मायनिंग लीज चे दूषित पाणी उपसण्याचे मोठे टेंडर घेणार आहे व परत नागरिकांच्या जीवासहानी असलेले लाखो लिटर दूषित पाणी नदी पात्रात सोडणार आहे. त्यामुळे (MMCL) महाराष्ट्र मिनिरल कॉर्पोरेट लिमिटेड चे हे पाणी उपसण्याचे टेंडर थांबवण्यात यावे व महसूल विभागाने याची पाहणी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा शिवसेनेना जाब विचारल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासोबत, राजू राठोड, युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके, तेजस राणे, गुरु पेडणेकर, वैभव मालंडकर, महेश कोदे, अनुप वारंग उपस्थित होते.