कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपघातांचं सत्र सुरूच आहे. दरम्यान रविवारी संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास कणकवली शिवडाव फाट्यावर दोन डंपर मध्ये अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी संध्याकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास शिवडाव फाट्यावर दोन डंपर एका मागून एक जात होते. दरम्यान मागे असलेल्या डंपर चालकाने आपल्या मालकीचा डंपर ओव्हरटेक करण्यासाठी पुढे नेला. मात्र पहिल्या डंपर च्या समोरून जाणारी बाईक त्याच्या जेव्हा निदर्शनास आली तेव्हा त्या बाईकस्वाराला वाचविण्यासाठी डंपर चालकाने अर्जंट ब्रेक लावल्यामुळे डंपर पलटी होऊन अपघात झाला. याअपघाताबाबत पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद नव्हती.