12 C
New York
Wednesday, March 12, 2025

Buy now

कलमठ गावात माकड पकड मोहीम ; ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त

कणकवली – येथील कलमठ गावात शहरात माकडांचे उपद्रव वाढला असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेती बागायतीत माकडांचा सातत्याने वावर आहे. नारळ, सुपारी सह अन्य फळ, फुल झाडांचे माकडांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेता कलमठ गावात माकडपकड मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी केली जात होती. याची दखल घेऊन ग्रामपंचायत कलमठ व वन विभाग सावंतवाडी यांच्या वतीने कलमठ गावात माकड पकड मोहीम राबवण्यात आली.

यावेळी सरपंच संदिप मेस्त्री, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर, सदस्य नितीन पवार, वन विभागाचे जलद बचाव प्रमुख सावंतवाडीचे अनिल गावडे, वैभव आमडोस्कर, दिवाकर बांबरडेकर बांबरडेकर, प्रसाद गावडे, ग्रामपंचात कर्मचारी खुशाल कोरगावकर, रमेश चव्हाण, अण्णा सावंत उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!