12 C
New York
Wednesday, March 12, 2025

Buy now

‘बसरा स्टार’ जहाज काढण्याच्या कामाला वेग

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिऱ्या किनाऱ्यावर अडकलेले बसरा स्टार जहाज काढण्याची प्रक्रियेने पाच वर्षांनंतर वेग घेतला आहे. सुमारे ४० लाख सेवा शुल्क (कस्टम ड्युटी) भरून केंद्र शासनाच्या परवानग्या घेण्याचे काम येत्या पंधरा दिवसात होणार आहे. त्यानंतर सुमारे ३५ कोटीचे हे जहाज अवघ्या दोन कोटींमध्ये भंगारात काढावे लागणार आहे. एम. एम. शिपिंग कार्पोरेशन कंपनीचे आतिफ सोलकर हे यासंदर्भात कस्टम, मेरिटाई बोर्डाशी पत्रव्यहार करत आहेत. परवानगी मिळाल्यानंतर दोन महिन्याच्या आत ते सडलेले जहाज कापून बाहेर काढले जाईल. त्यामुळे यंदाचा पावसापूर्वी रखडलेले मिऱ्या बंधाऱ्याचे सुमारे दोनशे मीटरचे काम करता येणार आहे. मिऱ्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या रखडलेल्या कामामुळे पतन विभागाने याबाबत मेरिटाईम बोर्ड आणि कस्टम विभागाला अडकलेले बसरा स्टार जहाज काढण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. त्याला मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांच्या आढावा बैठकीत अधिक चालना मिळाली. त्यामुळे हे जहाज काढण्याच्या कामाला गती मिळाली आहे. बसरा स्टार जहाज ३ जून २०२० ला निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडले. वादळाचा धोका वाढल्याने सुरक्षेसाठी हे जहाज समुद्रात नांगरून ठेवण्यात आले होते. मात्र अजस्त्र लाटांच्या तडाख्यात नांगर तुटून हे जहाज भरकटत मिऱ्या समुद्रकिनारी लागले. या जहाजामध्ये १३ कुजर होते. रेस्क्यू करून १३ जणांचा जीव वाचविण्यात यंत्रणेला यश आले. दुबईहुन हे जहाज मालदीपला जात होते. तेव्हा ही दुर्घटना घडली. हे जहाज काढण्यासाठी आता एम एम शिपिंग कार्पोरेशन कंपनी कस्टम आणि मेरिटाईम बोर्डाच्या कन्सल्टंट म्हणून काम करत आहे दुबई येथील जहाज मालकाशी संपर्क झाला असून त्याला ४० लाखाची कस्टम ड्युटी भरल्यानंतर ते भंगारात काढण्याबाबतची प्रक्रिया सुरू होणार आहे कन्सल्टंट कंपनीने तस्मा पत्रव्यवहार सुरू केला आहे. केंद्र शासनाचा भंगारात काढण्याबाबत परवानगी मिळाल्यानंतर कस्टम विभाग या जहाजाचे मूल्यांकन करेल. मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी देखील याला दुजोरा दिला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!