12 C
New York
Wednesday, March 12, 2025

Buy now

गावातील बालकाच्या अंत्यविधीला जाताना भीषण अपघात

चौके व्यापारी संघटना अध्यक्ष नंदकुमार राणे यांचा दुर्दैवी मृत्यू

दुहेरी मृत्यूच्या घटनेने चौके गावासाह संपूर्ण पंचक्रोशीवर शोककळा

चौके : चौके गावातील एका छोट्या मुलाच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीकडे दुचाकीवरून जाणाऱ्या चौके आदर्श व्यापारी संघटना अध्यक्ष नंदकुमार हिरोजी राणे (वय 54) यांचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी चौके स्मशानभूमी नजीन रस्त्यावर घडली.

मागाहून येणाऱ्या दुसऱ्या मोटरसायकलने धडक दिल्याने हा अपघात घडला. यां प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात धडक देणाऱ्या मोटरसायकल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदकुमार राणे हे चौके गावासह पंचक्रोशीत घराघरात एक हक्काचा माणूस म्हणून ओळखळे जात. मंगळवारी गावातील कुळकरवाडी येथे व्यापारी बांधव किराण गावडे यांच्या तीन वर्षाच्या मुलाचा अल्पशा आजाराने अचानक झालेल्या निधनाच्या दुःखात सहभागी होते. या छोट्या मुलाच्या अंत्यविधीसाठी चौके स्मशानभूमीकडे दुचाकीवरून डबलसीट जात असताना स्मशान भूमीजवळच रस्त्यावर मागाहून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात नंदू राणे यांच्या डोक्याला मार लागून गंभीर दुखापत झाली. यावेळी मोठया प्रमाणात रक्तत्राव झाला. त्यांना तात्काळ चौके ग्रामीण रुग्णालयात नेत प्राथमिक उपचार करत रुग्णवाहिकेने कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांना वाचवण्यासाठी अटोकात प्रयत्न करण्यात आले मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नना यश आले नाही. डोळ्यादेखत अपघात होहूनही नंदूला वाचवता आले नाही याचीच खंत सर्वांनाच चटका लावून गेली.

नंदू हे राणे कुटुंबातील कर्ताकमवते होते. चांगले शिक्षण घेऊनही नोकरी न करता वडिलोपार्जित किराणा दुकानाचा व्यवसाय शेती करत असायचे . नंदू यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राणे कुटुंबावर मोठे संकट ओडवले आहे. त्यांच्या पच्छात वृद्ध वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, विवाहित बहिणी- भावोजी, मुंबईस्थीत काका काकी, चुलत भाऊ आसा परिवार आहे. नंदू राणे यांच्या अकाली निधनाची बातमी समजतात चौके गावासाह संपूर्ण चौके पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे. नंदू राणे यांची अंतयात्रा आज बुधवारी सकाळी 9 वाजता चौके बाजारपेठ येथील निवासस्थानावरून निघणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!