पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट; घडलेली घटना दुदैवी, समर्थन करणार नाही
कुडाळ : झाराप येथे घडलेल्या पर्यटकांना मारहाण करणाऱ्या प्रवृत्तीचा झाराप येथील मुस्लिम समाजाने निषेध केला आहे. घडलेली घटना दुर्दैवी आहे अशा वाईट प्रवृत्तींना आम्ही अजिबात थारा देणार नाही आणि समर्थन करणार नाही, अशी भूमिका झाराप येथील ग्रामस्थ रफिक शेख व मुस्लिम समाजातील घेतली आहे. सिंधुदुर्गात जिल्ह्यात सर्व समाज एकत्र येऊन मिळून मिसळून राहत आहे. त्यामुळे अशा प्रकरणामुळे दोन धर्मात तिढा निर्माण होऊ नये यासाठी आपण ही भूमिका स्पष्ट करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करून त्यांनी मुस्लिम धर्मियांच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी मुनाफ खान, तरबेज आजगावकर, आसिफ मुजावर, वहाब डिचोलकर आदी उपस्थित होते. यावेळी श्री. शेख म्हणाले, काही दिवसांपूर्वी झाराप झिरो पॉईंट येथे पर्यटक आणि हॉटेल व्यावसायिक त्याच्यातून जे काय गोष्टी वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून बाहेर यायला लागल्या. त्या त्यांच्या प्रकरणाशी आमच्या गावातील मुस्लीम समाजाचा काहीही संबंध नाही. जी काही मारहाणीची घटना घडली त्याचा मी गावाच्या वतीने त्याचा निषेधच करतो. त्याला आमचे समर्थन नाही. पण काही बातम्या मुस्लिम समाजाच्या बाबतीत येऊ लागल्या, त्यामुळे हि पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू आम्ही मांडत आहोत. श्री. शेख पुढे म्हणाले, मुस्लिम समाजाच्या वतीने या अशा वाईट प्रवृत्तीला आम्ही त्याला थारा देणार नाही आणि आमचे समर्थन पण नाही. फक्त एवढंच आहे की ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज सर्व समाज आम्ही एकत्र मिळून जे राहतो त्याला कुठेतरी तडा जाऊ नये. म्हणूनच ही प्रेस घेऊन आम्ही या प्रसार माध्यमाच्या द्वारे सर्व सिंधुदुर्गवासीयांपर्यंत आम्हाला हे पोचवायचे आहे. आमचे घडलेल्या गोष्टींना समर्थनही नाही आणि आम्ही त्याला पाठिंबाही देत नाही. उलट सोमवारी संध्याकाळी त्या ठिकाणी पोलीस प्रशासन ती टपरी पाडण्यासाठी आले होते. त्यावेळी आम्ही गावातले काही व्यक्ती उभे राहून अनधिकृत जी टपरी होती ती सुद्धा त्या ठिकाणी हटवलेली आहे. आमच्यावर कुठल्याही राजकीय पक्षाचा दबाव नाही किंवा आम्ही कोणाला संपर्क केलेला नाही. फक्त आमच्या मुस्लिम समाजाचा नाव कुठेतरी बदनाम होऊ नये आणि त्याला वेगळे वळण वळून मिळू नये त्याच्यासाठी आम्ही हे प्रसार माध्यमातून प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत असे श्री. शेख यांनी शेवटी सांगितले.