7.6 C
New York
Wednesday, March 12, 2025

Buy now

शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी “फार्मर आयडी” आवश्यक – रविंद्र कुडाळकर

ओटवणेत फार्मर आयडी कार्ड शिबीर संपन्न

सावंतवाडी : माणसाची ओळख म्हणून आधार कार्ड आवश्यक आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची ओळख म्हणून फार्मर आयडी आवश्यक आहे . शासनाच्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी व शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी हे फार्मर आयडी आवश्यक आहे, असे प्रतिपादन रवींद कुडाळकर यांनी केले. ओठवणे ग्रामपंचायतच्या वतीने शेतकरी ओळख पत्र (फार्मर आयडी ) बनविण्यासाठी व शेतकऱ्यांपर्यंत जनजागृती होण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सरपंच दाजी गावकर, उपसरपंच संतोष कासकर, पोलीस पाटील शेखर गावकर ,रवींद्र म्हापसेकर, अश्विनी तावडे, विलवडे सरपंच प्रकाश दळवी, उद्योजक तथा प्रगत शील शेतकरी रवींद्र कुडाळकर, ओटवणे ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री कुडाळकर म्हणाले, या कार्ड मध्ये शेतकऱ्यांचा पूर्ण डाटा असल्यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या विविध उपक्रमांचा लाभ घेता येणार आहे तसेच या कार्ड साठी शेतकऱ्याचे सातबारा ,आठ अ, आधारकार्ड गरजेचे आहे. तसेच विविध कार्यकारी सेवा सोसायटी, ओटवणे येथे ही शेतकरी ओळख पत्रे बनून दिली जाणार आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!