कणकवली : लग्नाचे अमिष दाखवून कणकवली शहरातील एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी सौरभ बाबुराव बर्डे ( वय ३१, रा. शिवाजीनगर कणकवली ) याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला कणकवली पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयासमोर हजर केले असता त्याला १५ फेब्रुवारी पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयी आरोपीने वर्षभर बलात्कार केला. अशी फिर्याद त्या महिलेने कणकवली पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर संशयित सौरभ बाबुराव बर्डे या तरुणाला कणकवली पोलिसांनी तातडीने घरी जाऊन ताब्यात घेतले. याप्रकरणी तपासी अधिकारी यांनी संशयीताचा रिमांड मागताना अनेक मुद्द्यांचा समावेश केला. सौरभ बर्डे याची वर्ष भरापूर्वी त्या महिलेशी मैत्री झाली होती. या मैत्रीचा फायदा घेऊन तसेच लग्न करण्याचे आमिष दाखवून सौरभ याने कणकवली शहरातील एका फ्लॅटवर तसेच आशिये रस्त्यालगत असलेल्या हॉस्पिटल समोरील बिल्डिंग मध्ये टाइच मुडेश्वर येथे नेऊन शारीरिक संबंध ठेवले. असे त्या महिलेने फिर्यादीत नमूद केले आहे.
महिलेच्या तक्रारीनुसार सोमवारी सकाळी सौरभ बर्डे याला कणकवली शहरातील शिवाजीनगर येथील राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे करत आहेत.