24.2 C
New York
Friday, August 29, 2025

Buy now

पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालय येथे सिटीस्कॅन इमारतीचा शुभारंभ

भाजपा शहराध्यक्ष आण्णा कोदे यांच्या शुभहस्ते व दीपक शेलार यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आला शुभारंभ

कणकवली : पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालय येथे सिटीस्कॅन इमारतीचा शुभारंभ भाजपा शहराध्यक्ष आण्णा कोदे व श्री. दीपक शेलार यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

याकामासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, व पराग शिरसाठ यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

याप्रसंगी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक विशाल रेड्डी, अमोल माने, प्रशांत बुचडे, श्रीम. सायली तिवरेकर, प्रीती कोरगावकर, परशुराम आलव, डॉ. माधव उबाळे, सलीम खोत, अनिकेत गुरव यांच्या उपजिल्हा रुग्णालयातील अधिकरी कर्मचारी उपस्थित होते.

शुभारंभ प्रसंगी आण्णा कोदे म्हणाले, सिटीस्कॅन सुविधा कणकवली उपजिल्हा रुग्णालयात अत्यंत गरजेची होती. सिटी स्कॅनच्या रुग्णांना केवळ सिटी स्कॅनसाठी जिल्हा रुग्णालय ओरोस येथे जावे लागत होते किंवा येथील खाजगी रुग्णालयाचा आसरा घ्यावा लागत होता. परंतु सर्वांचे लाडके कार्यतत्पर पालकमंत्री व राज्याचे मत्स्यद्योग आणि बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या पाठपुराव्याने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन इमारतीचा शुभारंभ झाला आहे. अगदी काही महिन्यांतच येथे सिटी स्कॅन मशीन देखील रुग्णसेवेत दाखल होईल, असे प्रतिपादन श्री. कोदे यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!