मसुरे | प्रतिनिधी : पेडणेकर पळसंब गावठणवाडी पाजदाकोंड येथे श्री.जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, पळसंब आणि ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, पळसंब यांच्या संयुक्त विद्यमाने वनभोजन संपन्न झाले.
सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रमोद सावंत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.स्वरसंदेश कराओके शो त्रिबंक श्री. संदेश रावले यांनी कार्यक्रमाची सुरुवात भक्तिमय गिताने करत कार्यक्रमाला उत्साह निर्माण केला. त्यानंतर निवृत्त सैनिक श्री. महादेव परब यांनी आरोग्य फिटनेस विषयी खुप साध्या पद्धतीने मागदर्शन करत जेष्ठ नागरिकांचे मनोरंजन केले
त्यानंतर आचरा पोलीस स्टेशनचे श्री. चौरगे श्री. परब यांनी जेष्ठ नागरिक यांच्या ऑनलाईन फसवणूक , सुरक्षा या विषयी मोलाचे मार्गदर्शन करत आपण कधीही हाक मारा पोलीस प्रशासन सदैव तुमच्या सोबत आहे असे मागदर्शन केले.
त्यानंतर दुपारी सर्व जेष्ठ नागरिक व प्रमुख पाहुणे व उपस्थितांना शाकाहारी व मांसाहारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
दुपारच्या सत्रात श्री. सुरेद्र सकपाळ त्रिंबक व श्री. गायकवाड सर यांनी जेष्ठ नागरिकांना खुप छान कविता विनोद सांगत मंनोरजन केले. त्यानंतर मंडळाचे आजीव सभासद श्री. दिगंबर साटम यांनी आपण सर्वांनी एकोप्याने राहूया. आज जेष्ठ नागरिक म्हणून एकत्र येत गाणी ऐकणे,खेळ खेळणे खुप आनंद देणारा होता. कायम स्मरणात राहील. आपण गुण्यागोंविदाने एका विचाराने राहूया असे मनोगत व्यक्त केले. तसेच मंडळाच्या वतीने जेष्ठ नागरिकांना ने आण करण्याकरिता गाडीची व्यवस्था करण्यात आली होती त्याचे कौतूक करण्यात आले .
श्री. पळसंब देवस्थान मानकरी जेष्ठ नागरिक श्री.अण्णा कापडी यांनी आजचा दिवस खुप आनंदाचा क्षण आहे आपण सर्वांनी मिळून मिसळून आज वनभोजन सोहळा साजरा करताना खुप मान्यवराचे विचार ऐकायला मिळाले तसेच पळसंब गावात नाविण्यपुरक उपक्रम मंडळाच्या वतीने आयोजित होत असतात त्याबद्दल मंडळाचे कौतूक केले.
तसेच सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्री. उल्हास सावंत , चंद्रकांत गोलतकर, अमित पुजारे ,अमरेश पुजारे , हितेश सावंत शेखर पुजारे , बबन पुजारे , वैभव परब , पोलीस पाटिल सौ पुनम गोलतकर उपस्थित होत्या जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. दादा गावकर , रतिका गोलतकर , मधुकर कदम , विश्वनाथ गोलतकर तसेच जेष्ठ नागरिक सभासद ,
आजी ,माजी सरपंच , उपसरपंच , सदस्य गावातील सर्व देवस्थान मानकरी, प्रतिष्ठित व्यक्ती, गावातील रहिवासी, महिलावर्ग आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.