8 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

संघटित, असंघटित कामगारांना न्याय देण्यासाठी भारतीय मजदूर संघास सहकार्य करु – पालकमंत्री नितेश राणे

घरेलु कामगारांना भांडी संच देण्याचा प्रयत्न करणार

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघटित, असंघटित क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय मजदूर संघास सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. तसेच जिल्ह्यातील घरेलू कामगारांना शासन आदेशानुसार संसारोपयोगी भांडी संच मिळावा यासाठी प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी भारतीय मजदूर संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधींना दिली. अशी माहिती जिल्हा सचिव हेमंतकुमार परब यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघटित, असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांची आज कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी भारतीय मजदूर संघाचे प्रदेश सचिव हरी चव्हाण, कोकण विभाग संघटनमंत्री भगवान साटम, जिल्हा सचिव हेमंतकुमार परब व जिल्हा कोषाध्यक्ष ओंकार गुरव उपस्थित होते. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदीत असलेल्या घरेलू कामगारांना महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार अनेक जिल्ह्यात संसारोपयोगी भांडी संचाचे वाटप करण्यात आले आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऑगस्ट २०२४ अखेर पर्यत १,४९५ एवढे घरेलू कामगार आजही भांडी संचापासून वंचित असल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच बांधकाम कामगारांचे प्रलंबित लाभ प्रस्ताव, कंत्राटी कामगार कायद्याची अमंलबाजावणी अशा प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करून न्याय मिळवून देण्यासाठी पालकमंत्र्यांना विनंती करण्यात आली. यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी संघटित, असंघटित क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय मजदूर संघास सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले आहे अशी माहितीही श्री.परब यांनी दिली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!