कणकवली : शैक्षणिक वर्ष एप्रिल २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन ची विद्यार्थीनी कु. साक्षी विनायक चौंबे हिने एस.एन.डी.टी विद्यापीठात प्रथम क्रामांक मिळविला. तसेच कांता ढेपे यांच्याकडून गोल्ड मेडल देण्यात आले. तसेच कु.सुचिता राणे हिने तृतीय वर्ष बी.सी.ए मध्ये एस.एन. डी.टी विद्यापिठात चतुर्थ क्रमांक पटकावला.
कु. साक्षी विनायक चौंबे हिचे प्राथमिक शिक्षण साकेडी प्राथमिक शाळा येथे तर १०वी व १२वी चे शिक्षण एस.एम. हायस्कूल कणकवली येथे पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी रिगल कॉलेज कणकवलीमधील एस.एन.डी.टी विद्यापीठ बी.सी.ए अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. तीन वर्षाच्या कोर्समध्ये तिने तृतीय वर्षातील एस.एन.डी.टी विद्यापीठाच्या २०२३ -२४ मध्ये झालेल्या सेमिस्टरमध्ये १००० गुणांपैकी ८३८ गुण मिळवुन “०” ग्रेड प्राप्त करून विद्यापिठात प्रथम क्रमांकासह मोल्ड मेडल पटकावले. ग्रामीण भागात शिक्षण घेऊन तिने कठोर परिश्रम करून उल्लेखनिय कामगिरी करून दाखविली. कु. सुचिता देविदास राणे हिने १०वी व १२वी चे शिक्षण खानापूर बेळगाव येथे झाले. पुढील शिक्षणासाठी रिगल कॉलेज कणकवलीमधील एस.एन.डी.टी विद्यापिठाच्या बी.सी.ए अभ्यासक्रमाला चतुर्थ क्रमांक पटकावला.
रिगल कॉलेज कणकवलीच्या शैक्षणिक क्षेत्रात एक मानाचा तुरा एस.एन.डी.टी विद्यापिठात रोवल्याने तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. विद्यापिठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव तसेच परीक्षा विभाग प्रमुख संतय नेरकर सर यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले. रिगल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन संजयराव शिर्के सर तसेच संचालिका सुमिता शिर्के यांनी तिचे संस्थेतर्फे अभिनंदन केले. तसेच रिगल कॉलेजच्या प्राचार्या तृप्ती मोंडकर यांनी मुलांच्या उल्लेखनिय कामगिरी व कठोर परिश्रमसाठी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांच्याकडून देखील अभिनंदन करण्यात आले.