कणकवली : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग, पुणे व रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजत दौरा पुढीलप्रमाणे आहे – सकाळी १०:१५ वा. ओमगणेश निवासस्थान येथून मोटारीने कलमठ येथे, श्री देव काशिकलेश्वर मंदिराच्या द्वितीय वर्धापन दिन सोहळयास उपस्थिती, सकाळी ११ वाजता मोटारीने देवगडकडे प्रयाण, सकाळी ११: ३० वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच विद्या विकास मंडळ, वेध विद्या मंडळ, खरेदी विक्री संघ, अर्बन बँक आदी संस्थांचे कै. मुकुंदराव फाटक यांच्या कुटुंबियांची सात्वंन भेट, दुपारी १२ वाजता मोटारीने मोपा, गोव्याकडे प्रयाण, दुपारी २ वाजता मोपा – गोवा येथे आगमन व राखीव, दुपारी ३:३५ वाजता मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा येथून आकासा एअर (QP-११४२) ने पुणे विमानतळाकडे प्रयाण, दुपारी ४:४५ वाजता पुणे विमानतळावर आगमन व मोटारीने वाघोली, पुणेकडे प्रयाण, सायंकाळी ५ वाजता वाघोली येथे आगमन व सदिच्छा भेट, सायंकाळी ५:३० वाजता मोटरीने चांदणी चौक, पुणेकडे प्रयाण, सायंकाळी ६:३० वाजता सौ. मनिषा व श्री. राजीव जामदार यांचे चिरंजीव आकाश यांच्या लग्नाच्या निमित्ताने स्वागत सोहळ्यास उपस्थिती, सायंकाळी ७ वाजता मोटारीने कळंबोली, पनवेलकडे प्रयाण, रात्रौ ९ वाजता नमो चषक २०२५ अंतर्गत कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनास उपस्थिती, रात्रौ ९:३० वाजता मोटारीने जुहू, मुंबईकडे प्रयाण, रात्रौ १०:३० वाजता अधीश निवासस्थान, जुहू येथे आगमन व मुक्काम.