वनक्षेत्रपाल वैशाली मंडल यांची माहिती
दोडामार्ग : तालुक्यात वन्य प्राणी याचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असुन शेतकरी हैराण झाले आहे त्यात केर येथे शेतात लावलेल्या तारेच्या फासकीत अडकून मृत्यू झाल्याची माहिती वनक्षेत्रपाल वैशाली मंडल यांनी दिली. याबाबत अधिक तपास करत आहेत
याबाबत सविस्तर वृत्त असे की ,केर गावात शनिवारी सकाळी मालकीच्या जंगल क्षेत्रात बिबट्या अडकून असल्याची माहिती सकाळी मिळाली. त्यानंतर वनविभागाची टीम सदर ठिकाणी तात्काळ रेस्क्यू साहित्यासह पोहचली असता बिबट्या तारेच्या फासकीमध्ये अडकून पडला असल्याचे दिसून आले.तसेच सदरची फासकी त्याच्या पोटाजवळ अडकलेली असून ते ठिकाण तीव्र उताराचे असल्याने फासकीमध्ये अडकलेला होता तरी सुटकेसाठी प्रयत्न करताना सदरची फासकी जास्त प्रमाणात खेचल्याने घट्ट होत त्याच्या पोटामध्ये अडकलेली दिसली त्यांनतर सदर बिबट्याला तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी केली असता बिबट्या मृत झाल्याचे सांगितले.
याबाबत सावंतवाडी वनविभागाकडून स्थानिकांना आवाहन करण्यात येत आहे की वनविभागास सहकार्य करावे शिकारी उद्देशाने फासकी लावणाऱ्याचे नाव,अवैद्य वाहतूक, अवैद्य वृक्षतोड करणाऱ्यांची माहिती कोणास असल्यास त्याची गुप्त माहिती वनविभागास द्यावी.माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल तसेच त्यास बक्षीस दिले जाईल.
सदर प्रकरणी वनविभागाने तात्काळ गुन्हा नोंद करून सदर गुन्हे प्रकरणाचा तपास सुरू केलेला आहे अशी माहिती वनविभागाकडून देण्यात दिली आहे.