10 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

जिल्ह्यातील विकासकामे गुणवत्तेसह वेळेत पूर्ण करा

पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

विविध विभागांचा घेतला आढावा

कणकवली : जिल्ह्याच्या विकासासाठी मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. जिल्ह्यातील विकासकामे व प्रकल्पांची कालबध्द नियोजनातून अंमलबजावणी करावी. ही कामे गुणवत्तेसह वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणाची असल्याने सर्वांनी जबाबदारीणे काम करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. कणकवली येथे विविध जिल्हास्तरीय यंत्रणांची आढावा बैठक पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्र्यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परीषद, जिल्हा नियोजन समितीमधील विविध यंत्रणांचा आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कापडणीस, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, जिल्हा नियेाजन अधिकारी यशवंत बुधावले तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले, चांगले रस्ते हे जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण असतात. जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करावीत. ती कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असावीत. जिल्ह्यातील विविध यंत्रणांनी शाश्वत गुणवत्तापूर्ण कामांची आखणी करताना दर्जात्मक बाबींमध्ये कुठलीही तडजोड करु नये. तसेच जिल्हा परीषदेला विकासात्मक कामासाठी दिलेला निधी वेळेत खर्च करावा. कोणत्याही विभागाचा निधी अखर्चित राहणार नाही तसेच निधी समर्पित होणार नाही याची दक्षता विभाग प्रमुखांनी घ्यावी असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!