कणकवली : श्री विश्वकर्मा जयंती उत्सव निमित्ताने कणकवली, सुतारवाडी येथे विश्वकर्मा मित्र मंडळ कणकवली सुतारवाडी च्या वतीने १० फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन विश्वकर्मा मित्र मंडळ कणकवली सुतारवाडी च्या वतीने करण्यात आले आहे.
आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम पुढील प्रमाणे – १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. श्रींची मूर्तीचे आगमन, सकाळी १०:३० वा. श्रींच्या मूर्तीवर अभिषेक, दुपारी १२ वाजता आरती व तिर्थप्रसाद, दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद, दुपारी ३ ते ५ वा. हळदीकुंकू, ५ ते ७ वा. रेकॉर्ड डान्स, सायं. ७ ते रात्री ९ सुश्राव्य भजने व रात्री ठीक ९:३० वाजता श्री. पार्सेकर यांचे दशावतार नाट्य मंडळ, उभादांडा वेंगुर्ला यांचे महान पौराणिक दशावतार नाटक होणार आहे.