कणकवली : तब्बल सत्तावीस वर्षानंतर राजधानी दिल्लीत भाजपचे सरकार आले आहे. तर आपच्या दहा वर्षाच्या सत्तेला सुरुंग लागलाय. याचा जल्लोष देशासह राज्यात देखील मोठ्या उत्साहात होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात देखील भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी येथील बस स्थानकासमोर दिल्लीत भाजपची सत्ता येताच जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीसह, मोदी साहेब तुम आगे बढो…. हम तुम्हारे साथ है, भारतीय जनता पार्टीचा… विजय असो, अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष संदीप मेस्त्री, कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे, विजय चिंदरकर, दत्ता काटे, साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम, युवा मोर्चा उपाध्यक्ष संतोष पुजारे, राजा पाटकर, निखिल आचरेकर, प्रसाद देसाई, समर्थ कोरगावकर, राजू हिर्लेकर, सुभाष मालंडकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.