10 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

आंगणेवाडीत भाविकांना सुलभ दर्शन व आवश्यक सुविधा मिळतील याची दक्षता घ्यावी

कोणतीही चूक नको: चुकीला माफी नाही

राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : कोकणची काशी समजल्या जाणाऱ्या श्री देवी भराडीचा उत्सव व आंगणेवाडी जत्रोत्सवात येणाऱ्या सर्व भाविकांची काळजी घ्या, पोटापाण्यासाठी आलेल्या स्टॉल धारक व्यवसायिकांना आवश्यक सुविधा द्या, एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्या, पोलीस, जिल्हा प्रशासन व आंगणे कुटुंबीय यांना जी गरज असेल ती पूर्ण करू यात कोणतीही चूक करू नका! चुकीला माफी नाही असे आदेश राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश नारायण राणे यांनी शनिवारी दिले. तर आंगणेवाडी मध्ये पाण्याच्या सुविधेसाठी आमदार निलेश राणे दहा टँकरची व्यवस्था करतील अशी ग्वाही त्यांनी दिली.

राज्यातील व परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिंधुर्गातील आंगणेवाडी मधील 22 फेब्रुवारी रोजी होत असलेल्या जत्रोत्सवात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, भाविकांना सुलभ दर्शन व त्यांच्या सुविधा, आंगणे कुटुंबीयांना उत्सव साजरा करताना पोलीस व प्रशासनाकडून हवे असलेले सहकार्य, आंगणेवाडी मधील अपूर्ण सुविधा, राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, मंत्री आदी व्हीआयपी व्यक्तींचा प्रोटोकॉल, या सर्व नियोजनाबाबत मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सोमवारी सिंधुदुर्ग नगरी येथे जिल्हाधिकारी भवनात ही बैठक झाली. यावेळी आपण पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड आदी अधिकारी, आंगणे कुटुंबीय लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

आंगणेवाडी मध्ये अपूर्ण कामे व आपल्या सेवा आहेत त्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करू. सोलर पॅनल चा नवा प्रस्ताव तयार करून पावर संदर्भातील प्रश्न पुढच्या काळात कायमस्वरूपी सोडवू मात्र यावर्षी सर्व विभागाच्या टीम टाईम ठेवा. वीज वितरण कंपनी, पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभाग, पोलीस व जिल्हा परिषद त्याशिवाय आपत्ती व्यवस्थापन या सर्वांनीच भाविकांच्या सुविधेकडे प्राधान्य लक्ष द्यावे. ज्या ठिकाणी गर्दी होते त्या ठिकाणी त्या ठिकाणी पोलिस दलाने विशेष लक्ष द्यावे, प्रामुख्याने महिलाचे दागिने व पर्स उडविणाऱ्या चोरट्यांवर कडक लक्ष ठेवावे. सीसीटीव्ही यंत्रणा अधीक कार्यक्षम करावी, बस डेपो ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवावा, पोट भरण्यासाठी येणाऱ्या व्यावसायिकाला अत्यावश्यक सुविधा पुरवाव्यात मात्र त्यांनी काही अनुचित प्रकार करू नयेत त्यांच्या ओळखपत्राची तपासणी करावी, सुरळीत वीज पुरवठा रहावा म्हणून वीज कंपनीने दक्षता घ्यावी, गर्दी व कायदा व्यवस्था याची अंमलबजावणी पोलिसांनी करावी मात्र भाविका नात्याचा त्रास होऊ नये याची दक्षता घ्यावी असे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले.

कमी तिथे राणे कुटुंबीय.

राणे कुटुंबीयांवर या जत्रोत्सवाची मोठी जबाबदारी आहे. आता खासदार राणे, आमदार राणे, मंत्रीही राणे आहेत, त्यामुळे आम्ही आमच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन सर्व सुविधा पुरवू.नियोजनाच्या आढाव्यासाठी स्पॉट मीटिंग व रंगीत तालीमय होईल. शासन कमी पडेल तिथे आम्ही त्याची पूर्तता करू. पाण्याचे तीन टँकर सरकार पूरवेल आणखी दहा टँकर ची गरज आंगणे कुटुंबीयांनी व्यक्त करतात ती सुविधा म्हणजे दहा टँकर आमदार निलेश राणे उपलब्ध करून देतील असा शब्दही मंत्री नितेश राणे यांनी तात्काळ दिला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व्हीआयपी आंगणेवाडीत दाखल होतील त्यांचेही प्रोटोकॉल सांभाळा, भाविकांना सुलभ दर्शन व त्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या असे मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!