5.5 C
New York
Thursday, March 13, 2025

Buy now

टोल फ्री ११२ ला सिंधुदुर्ग पोलिसांच्या त्वरित प्रतिसादामुळे झारापमधील गुन्हेगार रंगेहाथ सापडले !

सिंधुदुर्गात पोलिसांची करडी नजरः अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले

सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : चहामध्ये माशी पडली म्हणून चहा बदलून द्या नाहीतर पैसे देणार नाही, असे त्या पर्यटकांनी सांगितले. या शुल्लक कारणावरून झाराप खान मोहल्ला झिरो पॉईंट जवळच्या शेख कुटुंबीयांनी त्या पर्यटकाला हातपाय बांधून मारझोड करत होते. पोलीस दलाच्या ११२ या नंबरवर त्याच्यासोबत असलेल्या पर्यटकांचा कॉल आला व सिंधुदुर्ग पोलीस पथक झटपट तिथे पोहचले. त्या पर्यटकांनी पोलिसात तक्रार द्यायला नकार दिला तरी पोलिसांनी स्वतः शेख कुटुंबियांमधील सहा संशयित गुन्हेगारावर गुन्हा दाखल केला. सिंधुदुर्ग पोलिसांनी टोल फ्री क्रमांकाला झटपट प्रतिसाद दिला व जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना विश्वास दिला.

झाराप झिरो पॉईंट येथील टपरी वजा हॉटेलमध्ये चहासाठी थांबलेल्या पर्यटक ग्रुपमधील रुपेश बबन सकपाळ (वय ३३, रा. कात्रज पुणे) या पर्यटकांला हॉटेल मालक व त्यांच्या कामगार असलेल्या शेख कुटुंबीयांनी हातपाय दोरीने बांधून काठीने व हाताने डोळ्यावर व ओठावर मारून दहशत माजविणारा हा गुन्हा केला. टोल फ्रीवर त्यातील एका पर्यटकांने ही खबर पोलिसांना दिली. ही खबर मिळताच हा गुन्हा सुरू असतानाच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.

महामार्गावर असलेल्या या हॉटेलचे मालक तनवीर करामत शेख, हॉटेलमध्ये काम करणारे शराफत अब्बास शेख, अब्बास उर्फ साहिल शराफत शेख, श्रीमती परविन शराफत शेख, श्रीमती शाजमीन शराफत शेख, तलाह करामत शेख अशा खान मोहल्ला झाराप येथे राहणाऱ्या शेख कुटुंबीयांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घाबरलेल्या पर्यटकांनी आपण पोलीस तक्रार करणार नाही असा जबाब दिल्यानंतर सरकार पक्षातर्फे पोलिस योगेश मुंडे यांनी फिर्याद देऊन ही कारवाई केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकां च्या सुरक्षिततेची जबाबदारी, निर्भय वातावरणात त्यांनी पर्यटनाचा आनंद लुटावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिसांची अशा गुन्हेगारी घटनांवर व कारवायांवर करडी नजर आहे. असेही अपर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेवाळे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.

शेख कुटुंबियांच्या हेतू बाबात चौकशी व्हावी !

एवढ्या शुल्लक कारणावरून एका पर्यटकाला हातपाय बांधून एवढी अमानुष मारहाण करण्याचे धाडस शेख कुटुंबीयांनी कसे केले याबद्दल पोलिसांनी सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्याची बदनामी होऊ शकेल म्हणून पोलिसांनी या घटनेत असलेल्या शेख कुटुंबियांची सखोल माहिती घेऊन त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची प्रतिक्रिया जिल्हाभरातून उमटली आहे. चहाच्या किरकोळ पैशासाठी एवढी अमानुष मारहाण करण्याबाबत त्यांच्या हेतूबाबतची ही चौकशी करावी अशी मागणी होऊ लागली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!