6.3 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

कवठेमहांकाळ येथील शालेय मुलांच्या सहलीची बस कसाल येथे नादुरूस्त

खासदार नारायण राणे व आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जेवण व गाडीची व्यवस्था

सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : सांगली तालुक्यातील कवठेमहांकाळ येथील कोंगनोळी गावातील जवळ परिषद शाळेच्या मुलांची सहल कोकण दर्शनासाठी सिंधुदुर्गात दाखल झाली. सिंधुदुर्गदर्शन झाल्यानंतर राज्य परिवहन मंडळ कवठेमहांकाळ आगराच्या गाडीतून ही मुले परत जात असताना कसाल बस स्थानक परिसरात रात्री ९:३० च्या दरम्यान ही गाडी नादुरूस्त झाली. त्या नंतर खासदार नारायणराव राणे व आमदार निलेश राणे यांच्याशी संपर्क करत संबंधित शाळेच्या शिक्षकांनी मदतीसाठी विनंती केली.

खासदार नारायणराव राणे व कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ४९ मुले ०८ शिक्षक बस ड्रायव्हर यांचया जेवणाची व्यवस्था कसाल स्टॅन्ड परिसरात करण्यात आली. त्या नंतर कुडाळ अगराची बस उपलब्ध करून देऊन या नवीन बस मधून या मुलांना कवठेमहांकाळ येथे रवाना करण्यात आले. यावेळी दादा साईल, राजन परब, योगेश घाडी, चिराग पावसकर, चिन्मय पावसकर, तुषार सावंत, आदी उपस्थित होते. यावेळी श्री. सिद्धिविनायक मित्रमंडळ कसाल बाजारपेठ यांनीही या मुलांसाठी पाणी बिस्कीट उपलब्ध करून देऊन सहकार्य केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!