20.4 C
New York
Wednesday, August 20, 2025

Buy now

सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत स्वराध्या पेडणेकर जिल्ह्यात प्रथम

वेंगुर्ले : युवा संदेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत केंद्रशाळा मठ नं. १ या शाळेतील दुसरी मधील विद्यार्थिनी स्वराध्या निलेश पेडणेकर हिने सुवर्णपदकासह जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. गोवा सायन्स सेंटर भेटीसाठी तिची निवड झालेली आहे. तसेच ब्रेन डेव्हलपमेंट या परीक्षेत तीने ब्राँझ पदक पटकावले आहे. स्वराध्याला तिचे आजोबा सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाबूराव कांबळी तसेच वर्गशिक्षिका अंजली माडये यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक अजित तांबे, तसेच सहाय्यक शिक्षक चिंदरकर नाईक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ यांच्याकडून अभिनंदन केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!