-1.3 C
New York
Monday, December 22, 2025

Buy now

एलसीबी ची धडक कारवाई | ओसरगाव बोर्डवेतील दोघांवर गुन्हा दाखल

कणकवली : रिक्षा मधून वाहतूक होत असलेल्या गोवा बनावटीच्या ५३ हजार रुपयांच्या अवैध दारुसह दीड लाख रुपये किंमतीची श्री सीटर रिक्षा असा २ लाख ३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल एलसीबी च्या पथकाने २९ जानेवारी रोजी जप्त करत ओसरगाव आणि बोर्डवे येथील दोन युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीष नामदेव देवळी (२९, ( रा. बोर्डवे, भोगारवाडी, ता. कणकवली) आणि रोहित राजेंद्र राणे ( वय ३२ रा. ओसरगाव गवळवाडी, ता. कणकवली) अशी आरोपींची नावे आहेत. एसपी सौरभकुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्या आदेशानुसार एलसीबी पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रामचंद्र शेळके, पीएसआय समीर भोसले, एएसआय सुरेश राठोड, हवालदार प्रमोद काळसेकर यांच्या पथकाने बुधवार २९ जानेवारी रोजी दुपारी १:३० वाजता ओसरगाव बोर्डवे तिठा येथे ही कारवाई केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!