22.3 C
New York
Thursday, July 3, 2025

Buy now

भाजी विक्रेता शिवा नायक खून प्रकरणातील ‘त्या’ तिघांच्या मुसक्या आवळल्या

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई

कुडाळ : भाजी विक्रेता शिवा नायक याच्या खून प्रकरणातील फरारी असलेले सिताराम राठोड अजित चव्हाण, आदीक चव्हाण या तिघांच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने मुसक्या आवळल्या असून हे तिघेजण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर सापडले.

कुडाळ शहरातील भाजी विक्रेता शिवा नायक याच्या खून प्रकरणातील सुनंदा नायक हिचा प्रियकर सिताराम राठोड व त्याचे भाचे अजित चव्हाण, आदीक चव्हाण हे फरारी झाले होते या तिघांना पोलीस शोधत होते दरम्यान गोपनीय सूत्रानुसार हे तिघेजण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा या ठिकाणी असल्याचे समजले या तिघांनाही स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले आणि कुडाळ पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक, श्री. सुधीर सावंत, पोलीस उपनिरीक्षक, श्री. सुरेश राठोड, सहा. पोलीस उपनिरीक्षक श्री. आशिष गंगावणे, श्री. सदानंद राणे, श्री. प्रमोद काळसेकर, श्री. अमित तेली, पोलीस हवालदार सर्व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग या टीमने ही कारवाई केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!