कोल्हापूर | यश रुकडीकर : चाकूचा धाक दाखवून अशोक अण्णाप्पा खांडेकर,वय ४५,मैथिली अपार्टमेंट, कावळा नाका ,कोल्हापूर ह्यांना लुटण्यात आले.त्यांच्याकडून पैशाचं पाकीट व त्यांची मोपेड गाडी बळजबरीने काढून घेत ३०,००० रुपये किंमतीच्या गाडीची चोरी करून चोर पसार झाले.
यानंतर अशोक खांडेकर यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादनुसार अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला.दिनांक ११ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजता खांडेकर हे लिशा हॉटेल समोरील पान शॉप येथे पान खाण्यास थांबले.त्यांनी आपल्या ॲक्टिवा गाडीला चावी तशीच ठेवून गेले असता एक इसम येऊन त्यांच्या गाडीवर बसला.खांडेकर पान खाऊन परत आल्यावर त्या इसमाने माझे एक काम आहे ते करून येऊया असे सांगत फिर्यादीना गाडीवर बसवले.इतक्यात त्याचा दुसरा साथीदार मागून येऊन गाडीवर बसला.त्या दोघांनी खांडेकर यांना रुईकर कॉलनी येथील एलआयसी कॉलनी मैदानावर नेऊन मारहाण केली.पुन्हा त्यांना गाडीवर बसवून चाकू दाखवत तुला ठार मारीन अशी धमकी देत त्यांना केकजी बेकरी समोर आणून सोडले व मोपेडगाडी घेऊन ते दोघे इसम पसार झाले.
हा गुन्हा नोंद होताच शाहूपुरी पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरण पथक अँक्शन मोडवर आले व त्या दोन इसमांचा शोध सुरू झाला.तपासात ते दोन इसम रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांची नावे १)पियूष शंकर पोवार व आदर्श संजय गायकवाड ,दोघे राहणार विचारे माळ,सदर बाजार असे असल्याचे कळाले.पोलिसांनी कदमवाडीकडून जाधववाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांना पकडुन ताब्यात घेतले. पोलिसी बळाचा वापर करताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
ही कारवाई सहा.फौजदार संदीप जाधव,मिलिंद बांगर,महेश पाटील,विकास चौगुले,रवी आंबेकर, सनिराज पाटील,बाबा ढाकणे व सुशील गायकवाड यांनी केली.