11.5 C
New York
Tuesday, December 17, 2024

Buy now

महिला बचत गट बैठकीत जोरदार वाद ; एकमेकांना केली धक्काबुक्की

कणकवली पोलीस ठाण्यात उशिरा पर्यंत नोंद नव्हती ; मात्र तालुक्यात मोठी चर्चा

कणकवली : नांदगाव असलदे शिवाजीनगर येथील महिला बचत गट बैठकीत जोरदार वाद निर्माण होऊन पुढे धक्का बुक्कीचा शेवट हातापायीपर्यंत पोचला. महिलांची भांडणे एवढी वाढली की पोलीसांना पाचारण करावे लागले. त्यांनतर काही महिलांनी काढता पाय घेतला. विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षाचा प्रचार केल्याच्या संशयावरून मनात राग ठेवून केलेले आरोप, त्यावरील तक्रारी, खोटे आरोप म्हणून प्रत्यारोप, खोटे आरोप म्हणून उपोषण या सगळ्याचा शेवट आज महिलांच्या मारामारीपर्यंत पोचला.

कणकवली तालुक्यातील तोंडवली येथील सिआरपी यांनी राजकीय पक्षाचा प्रचार केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. यानंतर गेल्या तीन दिवसांपासून त्या सिआरपी सावंत या तोंडवली बावशी गृप ग्रामपंचायत येथे उपोषणाला बसल्या होत्या. कालच आश्वासन मिळाल्याने दुपारी उपोषण मागे घेतले आणि आज नांदगाव विभागातील बचत गटचे १५ सिआरपी व बचत गट ग्रामसंघ यांची बैठक नांदगाव असलदे शिवाजीनगर येथे बैठक सुरू होती बैठक सरतेशेवटी तोंडवली येथील उपोषण केलेल्या सिआरपी यांचा विषय काहींनी काढला असता हा विषय फक्त तोंडवली गावापुरता आहे. यामुळे येथे हा विषय घेऊ नये असे सांगितले आणि त्यानंतर सिआरपी व काही महिलांमध्ये राडा झाला. राडा झाल्यानंतर लागलीच महिलांनी ११२ डायल करून याबाबत पोलीसांना माहिती दिली.

यावेळी दिव्या कांडर, मनश्री हेमंत कांडर, प्रभावती मर्ये, यांनी सीआरपी सावंत यांना धक्काबुक्की केली. यावेळी त्या खाली पडल्य. त्यांची प्रकृती अस्वस्थ झाली. शिवाय दिपक कांडर, दशरथ मर्ये, निलेश साळसकर, यांनीही सावंत यांना धक्काबुक्की करणा-या महिलांना सहकार्य केल्याचे उपस्थित काही महिलांकडून सांगण्यात आले.

१५ बचत गट सीआरपी सावंत
यांच्या बाजूने

सीआरपी सावंत यांची या पदावरून हटवावे अशी मागणी करण्यात आली होती मात्र २० पैकी १५ बचत गटांनी सावंत याच पदावर असव्यात अशी मागणी केली आहे.

दरम्यान हा मारहाणीच्या घटनेनंतर तात्काळ घटनास्थळी पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पो.उ.नि.शेडगे, पोलीस हवालदार देसाई, पांडुरंग पांढरे, पोलीस नाईक मनोज गुरव, पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने, राहुल राउत, किरण मेथे, महिला पोलीस कॉन्स्टेबल पुजा नांदोस्कर आदीनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.

याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदविण्याचे काम उशिरा पर्यंत सुरू होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!