सिंधुदुर्ग : गंगावेश परिसरात सुभाष हरी कुलकर्णी हे कुटुंबीयांसमवेत राहतात फेब्रुवारी २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत करणी करण्यासाठी विविध धार्मिक विधी करण्याच्या नावाखाली कुलकर्णी यांच्याकडून रोख रक्कम आणि दागिने अशी जवळपास ८४ लाख रुपयांची लूट एक भोंदू बाबांच्या टोळीने केली होती. या प्रकरणी कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून मुख्य संशयित दादा पाटील महाराज यांच्यासह नऊ जणांविरुद्ध जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान यातील मुख्य संशयित पोलिस कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक हिला जुना राजवाडा पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा सिंधुदुर्ग येथून ताब्यात घेतलं आहे. तृप्ती मुळीक हिला न्यायालयात हजर केले असता तिला न्यायालयाने १४ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.