-0.1 C
New York
Thursday, March 19, 2026

Buy now

राष्ट्रीय तायक्वांदोसाठी एकनाथ धनवटे, अक्षय कुलकर्णी यांची निवड

कणकवली: गोवा येथे होणाऱ्या चौथ्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून जिल्ह्यातील तायक्वांदो राष्ट्रीय पंच, प्रशिक्षक एकनाथ धनवटे व अक्षय कुळकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली गोवा तायक्वांदो असोसिएशनच्या सहकार्याने तायक्वांदो अकॅडमी ऑफ वास्को आयोजित ही स्पर्धा पेडम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इंडोअर स्टेडियम, म्हापसा, गोवा येथे तीन दिवस होणार आहेत. १३ ते १५ डिसेंबर या तीन दिवसांत ही स्पर्धा होणार आहे. या यशाबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पाठारे, कोषाध्यक्ष व्यंकटेश करर्रा, प्रवीण बोरसे, सुभाष पाटील, तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे पदाधिकारी राष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक व पंच भालचंद्र कुळकर्णी, सुधीर राणे, विनायक सापळे, अमित जोशी आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!